मृत्यूच्या ५० वर्षांनंतरही बाबा हरभजन सिंगचं नाव घेताच चिनी सैनिकांची टरकते

4503
baba harbhajan singh in marathi, baba harbhajan singh fear files, baba harbhajan singh photos, baba harbhajan singh shoes, baba harbhajan singh quora, baba harbhajan singh temple location, baba harbhajan singh videos, nathula pass, dead soldier on duty, बाबा हरभजन सिंग, बाबा हरभजन सिंग मंदिर, बाबा हरभजन सिंग आत्मा

चीनी शिपायांनी सुद्धा बाबा हरभजन सिंग यांना अनेक वेळा घोड्यावर स्वार होऊन पेट्रोलिंग करताना पाहिले आहे.

काही गोष्टी या चर्चेच्या विषय बनून जातात. देशातल्या एका सैनिकाची अशी एक कहाणी आहे जी इतिहास बनून गेली आहे पण त्याची चर्चा आजही होते. अश्या काही घटना, गोष्टी असतात, ज्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण जाते. असे एक सैनिक आहेत, ज्यांनी मृत्यूनंतर सुद्धा आपलं काम पुर्ण निष्ठेने पार पाडले आहे. शहीद झाल्यानंतरही ते सैन्यामध्ये आहेत, सैन्यात त्यांना देवासारखे पुजलेसुध्दा जाते. आश्चर्यचकीत करणारी हि कहाणी आहे बाबा हरभजन सिंग यांची.

३० ऑगस्ट १९४६ ला जन्मलेले बाबा हरभजन सिंग हे ९ फेब्रुवारी १९६६ मध्ये भारतीय सैन्यात, पंजाब रेजिमेंटला शिपाई म्हणून भरती झाले. १९६८ मध्ये ते २३ व्या पंजाब रेजिमेंटसोबत सिक्कीमला कार्यरत होते. ४ ऑक्टोबर १९६८ मध्ये एक काफिला घेऊन जाताना, सिक्कीमच्या नाथूला जवळ त्यांचा पाय घसरून घाटात पडल्यामुळे मृत्यु झाला. तो घाट पाण्याने भरलेला होता व वरून वेगाने येणाऱ्या पाण्याने त्यांचे शरिर वाहून २ किलोमीटर दुर निघून गेले. असं म्हटलं जातं कि, ते आपल्या सहकारी सैनिकाच्या स्वप्नात आले व आपल्या शरिराबद्दल त्यांनी आपल्या सहकार्याला माहिती दिली.

baba harbhajan singh in marathi, baba harbhajan singh fear files, baba harbhajan singh photos, baba harbhajan singh shoes, baba harbhajan singh quora, baba harbhajan singh temple location, baba harbhajan singh videos, nathula pass, dead soldier on duty, बाबा हरभजन सिंग, बाबा हरभजन सिंग मंदिर, बाबा हरभजन सिंग आत्मा
(Soure – MensXP.com)

त्यांचे शरीर शोधण्यासाठी भारतीय सैन्याला तीन दिवसांचा अवधी लागला. बाबा हरभजन सिंग यांचे पार्थिव त्यांनी आपल्या सहकार्याला स्वप्नात सांगितलेल्या जागेवरच मिळाले. काही लोकांचं असही म्हणणं आहे कि, स्वप्नातच त्यांनी अशी इच्छा व्यक्त केलेली कि त्यांचं एक स्मारक बनवलं जावं. भारतीय सैन्यानी त्यांच्या इच्छेचा मान ठेवून, त्यांचं शरीर ज्याठिकाणी मिळालं त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक बांधले. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास व आदर होता, त्यामुळेच भारतीय सैन्याने त्यांचं स्मारक 9 किलोमीटर जमिनीच्या आत बनवले, जिथे आता बाबा हरभजन सिंग नावाने एक मंदीरही प्रसिद्ध आहे.

प्रत्येक वर्षी इथे हजारोंच्या संख्येने लोकं दर्शनाला येतात, त्यांच्या समाधीबद्दल लोकांचे म्हणणे आहे कि, इथे पाण्याने भरलेली बाटली ठेवली असता, काही दिवसांनी चमत्कारिक गुण त्या बाटलीत दिसू लागतात आणि ते पाणी २१ दिवस नित्यनेमाने प्यायले असता, आपले सर्व रोग पुर्णपणे बरे होतात.

असही बोललं जातं कि, मृत्युनंतरसुध्दा बाबा हरभजन सिंग नाथूला जवळ असणाऱ्या चिनी सैन्यांची माहिती आपल्या साथी सैनिकांच्या स्वप्नात येऊन देत असत.

त्यांनी दिलेली माहिती हि शंभर टक्के खरी ठरत असे आणि याच कारणामुळे ते मरणोत्तरही सैन्यामध्ये कार्यरत असल्याचे कळते.

baba harbhajan singh in marathi, baba harbhajan singh fear files, baba harbhajan singh photos, baba harbhajan singh shoes, baba harbhajan singh quora, baba harbhajan singh temple location, baba harbhajan singh videos, nathula pass, dead soldier on duty, बाबा हरभजन सिंग, बाबा हरभजन सिंग मंदिर, बाबा हरभजन सिंग आत्मा
Baba Harbhajan Singh Temple (Source – Tripoto)

तसेच, भारतीय सेनेने त्यांना आजही आपल्यात जिवंत ठेवले आहे. बाबा हरभजन सिंग यांना नाथुला चे हिरो म्हटले जाते. बाबा हरभजन सिंग यांच्या मंदिरात त्यांचे बुट व बाकी काही सामान ठेवले आहे आणि भारतीय सैन्याचे जवान, बाबाच्या मंदिराची राखण करताना दिसतात व रोज त्यांच्या बुटांना पॉलिश करून त्यांची वर्दी ते स्वच्छ करतात. तिथे त्यांच्या झोपण्याकरता पलंगही लावला जातो. तिथे तैनात असणाऱ्या शिपायांचे म्हणणे आहे कि सकाळी त्यांचे अंथरून विस्कटलेले असते व स्वच्छ केलेल्या बुटांना रोज चिखल लागलेला दिसतो.

बाबाच्या आत्म्याबद्दल असलेली हि रहस्य फक्त भारतच नाही, तर चिनी सेनासुध्दा सांगाताना दिसते.

खुद्द चीनी शिपायांनी बाबा हरभजन सिंग यांना घोड्यावर स्वार होऊन पेट्रोलिंग करताना पहिले आहे.

भारतीय सैनिकांसोबतच चिनी सैनिकही, आजही बाबा आपल्यात असल्याचे सांगतात. म्हणूनच, दोन्ही देशांच्या फ्लॅग मीटिंगच्या वेळी एक खुर्ची बाबा हरभजन सिंगच्या नावे रिकामी ठेवली जाते.

baba harbhajan singh in marathi, baba harbhajan singh fear files, baba harbhajan singh photos, baba harbhajan singh shoes, baba harbhajan singh quora, baba harbhajan singh temple location, baba harbhajan singh videos, nathula pass, dead soldier on duty, बाबा हरभजन सिंग, बाबा हरभजन सिंग मंदिर, बाबा हरभजन सिंग आत्मा
(Source – Motherland Magazine)

सर्व भारतीय सैनिकांप्रमाणेच बाबा हरभजन सिंग यांनासुद्धा महिन्याचा पगार दिला जातो. सेनेच्या पेरोलमध्ये आजही बाबांचे नाव लिहीले जाते. सेनेच्या नियमानुसार त्यांना पदोन्नती पण दिली जाते. आता बाबांना शिपाई वरून कॅप्टन पदावर बढती मिळाली आहे. प्रत्येक वर्षी त्यांना १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत दोन महिन्यांची सुट्टी दिली जाते आणि त्यांच्यावर असणाऱ्या विश्वासापोटी स्थानिक लोक त्यांना दोन जोडी वर्दी, टोपी, बुट ह्या सर्व भेटवस्तू देतात. ह्या भेटवस्तू दोन सैनिकांसोबत त्यांच्या गावी पंजाबला पाठवल्या जातात.

त्यांच्या नावे ट्रेनचे बुकिंगसुध्दा केले जाते. तिथे त्यांचे सर्व सामान त्यांच्या आईकडे सोपवले जाते. सुट्टी संपल्यानंतर ते सामान पुन्हा आणून त्यांच्या समाधीजवळ ठेवले जाते. पण, काही वर्षांआधी या प्रेमाला लोकांनी अंधविश्वासाचे नाव दिले, म्हणून त्यांची हि सुट्टीची यात्रा बंद करण्यात आली. बाबांच्या आदरापोटी केलेल्या कामांवर भलेही प्रश्नचिन्ह उभे राहुदेत किंवा त्यांना अंधश्रद्धा म्हणू देत, पण भारतीय सैन्याचे म्हणणे आहे कि त्यांना इथूनच खरी शक्ती मिळते. अशा तर्‍हेने आजही बाबा आपल्या देशाच्या सेवेत कार्यरत आहेत.

baba harbhajan singh in marathi, baba harbhajan singh fear files, baba harbhajan singh photos, baba harbhajan singh shoes, baba harbhajan singh quora, baba harbhajan singh temple location, baba harbhajan singh videos, nathula pass, dead soldier on duty, बाबा हरभजन सिंग, बाबा हरभजन सिंग मंदिर, बाबा हरभजन सिंग आत्मा
(Source – Procaffenation)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here