“फक्त २० वर्षे उभे राहण्याची परवानगी असलेले आयफेल टॉवर आज १३० वर्षे झाले तरी दिमाखात उभे आहे.”
आयफेल टॉवर ( Eiffel tower ) हे जगाला भुरळ घालणारे नाव. आयफेल टॉवर शिवाय पॅरिस कसे असते ? उत्तर आहे की, पॅरिसने जगाला त्याचे महत्त्व आणि आकर्षण टॉवर बांधण्याआधी सुद्धा सिद्ध केलेच होते, स्थापत्य शैलीचे आश्चर्यकारक नमुने ह्या शहरात भरपूर आहेत त्यापैकी काही नावे म्हणजे, लोवुरे (louvre), आर्क डी ट्रायम्फ आणि नोट्रे-डेम. पण आता आयफेल टॉवरने उंची मुळे सगळ्यांना मागे टाकले आहे.
पॅरिसमध्ये १८८९ साली तयार झालेले, जगातील ७ आश्चर्यापैकी एक असलेले प्रसिद्ध ‘आयर्न लेडी’ म्हणजेच आयफेल टॉवरचे उद्घाटन होऊन आता १३० वर्षे झालेत. तरीही हे जगातील सर्वात जास्त तिकीट काढून, भेट दिल्या जाणाऱ्या स्मारकांपैकी एक आहे. दरवर्षी सुमारे सात दशलक्ष लोक जिन्याच्या साहाय्याने किंवा लिफ्टने, ह्या टॉवरचे प्रसिद्ध तीन मजले चढून जातात.
आयफेल टॉवर (Eiffel tower) फ्रान्सच्या पॅरीस शहरातील कॅम्प दी मार्स भागात उभा केलेले आणि लोखंडी सळई च्या जाळयांनी बनविलेले एक टॉवर आहे. या टॉवरचे नाव आयफेल टॉवर डिझाइन बनवणा-या आणि बांधणाऱ्या कंपनीचे जे मालक होते गुस्तावे एफिल/आयफेल यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावावरून ठेवले गेले आहे.
आयफेल टॉवर बद्दल मजेदार माहिती
या टॉवरची उंची ३२४ मीटर म्हणजेच १०६३ फूट आहे. हे टॉवर एखाद्या ८१ मजली इमारती इतके उंच आहे. टॉवरचा तळमजला वर्गाकार आहे, ज्याची प्रत्येक बाजू १२५ मिटर इतकी आहे. याचे बांधकाम करतानाच या टॉवरने त्या पूर्वीचा सर्वात उंच मानवनिर्मीत टॉवर म्हणजेच वाॅशिंग्टन येथील मोनुमेंटचा रेकाॅर्ड मोडला होता.
या टॉवर वर पर्यटकांना बघण्यासाठी ३ मजले आहेत. ज्यापैकी पहिल्या आणि दुस-या मजल्यावर एक मोठ्ठे हॉटेल त्याचे नाव ज्यूल्स वेर्ने रेस्टॉरन्ट आहे. या टॉवरच्या सगळ्यात वरच्या मजल्यावरून पर्यटकांना पॅरिस शहराचे अतिशय रमणीय दृश्य दिसते. या मजल्याला खूप छान सजवले गेले आहे. पहील्या दोन मजल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना तिकीट घ्यावे लागते. खालुन पहिल्या मजल्यावर पर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास ३०० जिने चढावे लागतात. आणि इतकेच जिने पहिल्या पासून ते दुस-या मजल्यावर जाण्यासाठी आहेत. पर्यटकांसाठी येथे लिफ्टची सुध्दा व्यवस्था आहे.
आयफेल टॉवर विषयी १५ रोचक गोष्टी ज्या तुम्ही कधीही ऐकल्या नसतील….
१) आयफेल टॉवरची लिफ्ट एका वर्षात १,०३,०० किलोमिटर, खाली-वर असा प्रवास करते. हे म्हणजे, पृथ्वीला २.५ वेळा प्रदक्षिणा घातल्यावर जे अंतर होईल तितकेच आहे.
२) आयफेल टॉवरच्या शेवटच्या मजल्यावरपर्यंत चढून जाता येते. परंतू यासाठी आपणांस १६६५ पायऱ्या चढून जाव्या लागतात त्यामुळे फारच कमी लोक पायऱ्या चढून जातात. परंतु आता सगळ्यात वरच्या मजल्यावर पायऱ्या चढून जाण्यास सुरक्षेच्या कारणांमुळे बंदी आहे.
३) पॅरिसच्या थंडीत हा टॉवर सुमारे ६ इंच आकुंचन पावतो, तर उन्हाळयात सूमारे ६ ते ७ सेंटीमीटर विस्तृत होतो.
४) आयफेल यांनीच स्टॅचु आॅफ लिबर्टीच्या आतील भागातील डिझाईन केले होते.
५) आयफेल टॉवर बनवण्यासाठी २ वर्षे २ महिने ५ दिवस इतका कालावधी लागला.
६) ७ वर्षातुन एकदा या टॉवरला रंग दिला जातो, त्यासाठी सुमारे ६० टन रंग लागतो.
७) जगात या टॉवरच्या अनेक प्रतिकृती केल्या आहेत, लास वेगास आणि चिन मधील थिमपार्क मध्ये ह्या प्रतिकृती आहेत.
८) २००८ मध्ये एका स्त्री ने या टॉवर बरोबर स्वतःचा विवाह करून आपले नाव बदलून ‘एरिकाला टूर आयफेल’ असे ठेवले होते.
९) गूस्ताव आयफेल यांनी तिस-या मजल्यावरील छोटासा भाग स्वतःच्या मित्रांसाठी राखीव ठेवला होता जो आता पर्यटकांसाठी खूला आहे.
१०) पॅरिस शहराच्या प्रशासनाने गुस्ताव आयफेलला स्पष्ट कल्पना दिली होती की हे टॉवर फक्त २० वर्षे च उभे राहू शकते, त्यानंतर ते पाडून नष्ट केले पाहिजे. पण नंतर नवीन रेडिओ ट्रांसमिशन तंत्रज्ञानाकडून अचानक मागणी झाली आणि टॉवरला पाडण्यापासून वाचवले गेले.
११) आयफेल टॉवरसाठी आतापर्यंत ३००० कोटी फ्रान्सी चलन खर्च झाले आहे.
१२) रात्रीच्या वेळी यावर सूमारे २५००० बल्बने रोषणाई केली जाते, ही चमचम रात्री बघण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे.
१३) टॉवरवर एकाच वेळी ५००० पेक्षा अधिक लोक सामावून घेण्याची क्षमता आहे.
१४) जर्मन सेनेने जेव्हा फ्रान्सवर आक्रमण केले तेव्हा सर्व लिफ्ट बंद केल्या गेल्या. जर्मन सैनिकांनी यावर जर्मन झेंडा लावण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले. हिटलरने हे टॉवर पडण्याचा सुध्दा प्रयत्न केला होता.
१५) फ्रान्सच्या राज्य क्रांतीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात हे टॉवर बनविण्याची कल्पना आणि प्रेरणा गुस्तावला मिळाली असे समजते.