अबब ! या मानवनिर्मित गोष्टी एवढ्या मोठ्या आहेत कि तुम्ही अंतराळातून देखील बघू शकता

अंतराळातून दिसणाऱ्या गोष्टी, things you can see from space, china wall, Almeria Greenhouses, Palm Islands, Great Pyramid of Giza, दुबईतील पाम बेट, चीनची भिंत, अल्मेरिया ग्रीन हाऊस

जगभरातील रंजक घडामोडी तसेच इतिहासातील काही गूढ आणि कुणालाही फारशा माहिती नसलेल्या गोष्टींचे अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा आमचे Facebook पेज  

रात्र झाली कि आपण सगळे आकाशात रात्रीचे सुंदर दृश्य बघत असतो. तुम्हाला आठवते का उन्हळ्यात गच्ची वर जाऊन सुंदर, निरभ्र, स्वच्छ आणि संपूर्ण चांदण्यांनी भरलेलं आकाश बघायला किती मज्जा येते. पण तुम्ही हा विचार कधी केला का कि आपली नजर सहज रित्या आकाशाकडे का वळते, आपण तासनतास एकटक आकाशात का बघतो, कारण ते खूप सुंदर दिसते म्हणून कि काही लोकांना अंतरिक्षला बघून आश्यर्य वाटते म्हणून ? जस कि, हे आकाश किती मोठे आहे ? यात किती चांदण्या असतील, किती ग्रह असतील, असे बरेच काही प्रश्न तुमच्या मनात येत असतील ना ?

जगातले काही भाग्यवान अवकाशयात्री आहेत त्यांनी अवकाशात जाऊन ग्रह बघितले. कारण मानवाने काही वस्तू इतक्या मोठया आणि विशिष्ट पूर्वक बनवल्या आहेत की त्यामुळे मनात एक प्रश्न येतो ती वस्तू अवकाशामधून दिसते कि नाही ? अवकाश यात्रींचे अनुभव आणि वेगवेगळ्या देशाचे उपग्रह यातून मिळालेल्या माहितीतून आज तुम्हाला हे वाचायला मिळेल कि मानवाने तयार केलेल्या वस्तू अवकाशामधुन दिसतात का आणि दिसत असल्यास कोणत्या आणि कशा दिसतात ? चला तर बघुयात अंतराळातून दिसणाऱ्या गोष्टी.

१. चीनची भिंत

जगातील सात आश्चर्यांमध्ये चीनच्या भिंतीचा देखील समावेश आहे. चीनची भिंत (The wall of China) हि मंगोलियाच्या प्रांतातून होणारे आक्रमण थांबण्यासाठी दगड, माती आणि विटा यापासून चारी दिशाला बांधलेली आहे. हि चीनची भिंत १३ हजार माइल्सपेक्षा अधिक म्हणजेच २१००० किलोमीटर्स पेक्षाही जास्त लांब आहे. चीनची भिंत हि शेकडो वर्ष जुनी असून ती मानवनिर्मित आहे. आतापर्यंत झालेल्या अवकाश यात्रेतून फक्त मानव निर्मित चीनची भिंत अवकाशातून दिसते, असे म्हटले गेले. पण हे खरे आहे कि खोटे ?

ISS (International Space Station) ने सिद्ध केले आहे कि, अंतराळातून दिसणाऱ्या गोष्टीमध्ये चीनची भिंत अवकाशातून दिसणे कठीण आहे. वातावरण जेव्हा पूर्ण स्वच्छ, साफ असेल तेव्हाच ती भिंत दिसते. कारण भीतीचा रंग हलकासा ब्राऊन असल्यामुळे तो वातावरणाशी एकदम मिळता-जुळता आहे.

International Space Station आकाशात ३५० किलोमीटर उंची पर्यंत फिरत असतो. त्याच्या तुलनेत चीनची भिंत दिसणे शक्य नाही. कारण पृथ्वी पासून चंद्र साडे ३ लाख पेक्षा अधिक किलोमीटर दूर आहे.

अंतराळातून दिसणाऱ्या गोष्टी, things you can see from space, china wall, Almeria Greenhouses, Palm Islands, Great Pyramid of Giza,  दुबईतील पाम बेट,  चीनची भिंत, अल्मेरिया ग्रीन हाऊस
ESA astronaut spots the Great Wall of China from the International Space Station (Source – gbTimes)
२. न्यूयार्क

न्यूयार्क हे साडे आठ हजार किलोमीटर मध्ये पसरलेले आहे. व्यवसाय आणि व्यापाराचा जागतिक केंद्र म्हणून न्यूयॉर्कची ओळख आहे. पर्यटन हे न्यूयॉर्क शहरासाठी (New York City) एक महत्त्वपूर्ण उद्योग असल्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पर्यटकांना न्यूयॉर्कने एकत्रितपणे बांधून ठेवले आहे आणि त्यामुळेच न्यूयॉर्क शहराची वाहतूक व्यवस्था विस्तृत आणि जटिल आहे, त्यामुळे न्यूयार्क हे शहर रात्रंदिवस जागे असते. अंतराळातून दिसणाऱ्या गोष्टी ची यादी केल्यास त्यात न्यूयॉर्क शहर आलेच पाहिजे. जेव्हा पृथ्वीवर दिवस असतो तेव्हा अवकाश मधून कोणतेही शहर दिसणे अवघड आहे. पण रात्री अवकाशातून न्यूयार्क हे शहर स्पष्ट दिसते त्यामागील कारण आहे लाईट. अंतराळातून दिसणाऱ्या गोष्टी आणि न्यूयॉर्क शहराचे आजपर्यंत तुम्ही जेवढे फोटो बघतात ते सगळे १००० किलोमीटर पेक्षा कमी अंतरावरून घेतलेले असतात.

अंतराळातून दिसणाऱ्या गोष्टी, things you can see from space, china wall, Almeria Greenhouses, Palm Islands, Great Pyramid of Giza,  दुबईतील पाम बेट,  चीनची भिंत, अल्मेरिया ग्रीन हाऊस
The U.S. East Coast from the ISS (Source – spaceref.com)
३. गिझाचे पिरॅमिड

अंतराळातून दिसणाऱ्या गोष्टी म्हटलं कि पृथ्वीवर काही ऑब्जेक्ट असे आहेत कि अंतरिक्ष मधून तुम्ही बघू शकता. पण काही असे पण ऑब्जेक्ट आहेत आय पॉवर लेन्स किंवा मॅग्निफाइन ग्लास कॅमेरा वापरावा लागतो. या ऑब्जेक्ट मध्ये मोठा गिझाचे पिरॅमिड (Great Pyramid of Giza) आहे, जे साडे चार हजार वर्षांपूर्वी बनवले गेले आहेत. सर्वात जुने आणि संपूर्ण अखंड असे प्राचीन जगाच्या सात आश्चर्यांपैकी गिझा पिरॅमिडची ओळख आहे. तर तुम्ही हे अंतरिक्ष मधून बघू शकता. फक्त हे नुसत्या डोळ्यांनी दिसणे अवघड आहे, कारण सॅटेलाईट १००० किलोमीटर पेक्षा देखील उंच असतात, त्यामुळे सॅटेलाईटने पिरॅमिड दिसणे अशक्य आहे.

अंतराळातून दिसणाऱ्या गोष्टी, things you can see from space, china wall, Almeria Greenhouses, Palm Islands, Great Pyramid of Giza,  दुबईतील पाम बेट,  चीनची भिंत, अल्मेरिया ग्रीन हाऊस
Great Pyramid of Giza (Source – Flickr)
४. दुबईतील PALM बेट

दुबई ने कृत्रिम बेट तयार करून जगभरात आपले नाव केले आहे. पाम आयलंड्सनि (Palm Islands) तीन कृत्रिम बेटे तयार केलेली आहेत, पाम जुमेराह, देइरा बेट आणि पाम जैबेल अली. 2001 मध्ये या बेटांची निर्मिती सुरू केली आणि नोव्हेंबर 2011 पर्यंत फक्त पाम जुमेराहचे काम पूर्ण झाले. या बेटाचा आकार खजुरीच्या झाडा सारखा आहे, जो अर्धवर्तुळाकार आहे. त्यात अजून ३०० कुत्रिम बेट तयार केलेले असल्यामुळे PALM बेट म्हणून त्याची ओळख आहे. जवळपास १ लाख घनमिटर मध्ये पसरलेले असून त्याची जगातील सगळ्यात मोठे कृत्रिम बेट म्हणून ओळख आहे. CHRIS HADFIELD हा एक अवकाश यात्री आहे. त्यांनी ३ वेळा यशस्वी अवकाश यात्रा केलेली आहे. त्यांनी काही PALM बेटांची फोटो घेतले होते, तर त्यांच्या म्हण्यानुसार अवकाशातून PALM बेट बघू शकतो पण चीनची भिंत नाही बघू शकत.

अंतराळातून दिसणाऱ्या गोष्टी, things you can see from space, china wall, Almeria Greenhouses, Palm Islands, Great Pyramid of Giza,  दुबईतील पाम बेट,  चीनची भिंत, अल्मेरिया ग्रीन हाऊस
Palm Islands in Dubai (Source – tengasepresente.blogspot.com)
५. स्पेनमधील अलमेराचा ग्रीन हाउस

स्पेनच्या दक्षिण किनाऱ्यावर ६४ हजार एक्कर मध्ये अलमेराचा प्रसिद्ध ग्रीन हाउस (Almeria Greenhouses) पसरलेले आहे. ३५ वर्षांपूर्वी, स्पेनच्या दक्षिणपूर्व भागात हा प्रदेश कोरडा आणि शुष्क आणि वाळवंटासारखा होता. या एकट्या ग्रीन हाउस मधून भाज्या आणि टमाटर, मिरपूड, काकडी आणि झुचिनिझ, फळे असे अनेक टन उत्पादन केले जाते. हे ग्रीन हाउस स्पेनिश सरकारच्या अर्थवेवस्थाला १.५ बिलियन डॉलरची मदत करतो आणि आश्चर्य म्हणजे तुम्ही हे ग्रीन हाउस अंतरिक्ष मधून दिवसा सुद्धा बघू शकता. ग्रीन हाउसची हे पांढरे बेट स्पेस मधून पण आरामशीर बघू शकता.

अंतराळातून दिसणाऱ्या गोष्टी, things you can see from space, china wall, Almeria Greenhouses, Palm Islands, Great Pyramid of Giza,  दुबईतील पाम बेट,  चीनची भिंत, अल्मेरिया ग्रीन हाऊस
almeria green house (Source – reddit.com)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here